उधाण आले मानसी

<300308215103sunday>

शत:जन्मानी उधाण आले तुझ्या गर्भ रेशमी तनुला
मम ओठांनी वेधिलेल्या त्या ओठांच्या कलशाला
लाजवी उपमेहुनी उपमा प्रिये प्रेमाची मधुशाला
तुझ्या मनपटलावरती आलेल्या त्या तरल मधुर प्रणयाला ||१||

उधाण आले मानसी तुझिया अंगाने नियतीला
अनमोलने जगविलेल्या काम-रति प्रणयाला
प्रणयाची ती अंतसीमा तू शोधण्या देह सजविला
किती काळ दवडिलाशी मानसी या मिलनाच्या रातीला ||२||

उधाण आले हास्याला गं स्मित भाष्य करण्याला
त्या देहाने या देहाला मीठी गलबलुन देण्याला
पिउन तुझ्या ओठांतील मदिरा अन तीही रसशाला
आठवल्या तन मन शाला या राजनिला रतिशाला ||३||

उधाण आले नयनांतिल त्या तेजंकित भ्रमराला
भ्रमराने प्राषीयलेल्या ह्रदयाच्या सौदर्याला
उधाण पाउण अंग अंग ते अंग मिळे अंगाला
येई उधाण मानसी पुन: पुन:आपुल्या गं प्रणयाला ||४||

"राजाचे जग.....एक मार्ग यशाचा"

आपण आहात "राजाचे जग.....एक मार्ग यशाचा" या एका वेगळ्याच विश्वात.......हो अगदी माझ्यासोबत. हे किती काल्पनिक आहे ना की आपण एक व्यक्तीवर प्रेम करतो आणि त्या व्यक्तीला माहित पण नसते की कोणाचे आपल्यावर इतके उद्दात प्रेम असुही शकेल? पण प्रेम तेच..........जे तुमच्यासोबत सर्व जग त्याची अनुभूति घेते.प्रेम तेच ............जे सर्वदूर आणि सवंगासुन्दर असते.प्रेम तेच..........जे मानसीने अनमोलवर केले आणि तीही चिम्ब झाली मानसी.........अनमोलच्या प्रेमात!!!