Friday, August 26, 2011

मानसी आणि मी जेंव्हा पहिल्यांदा भेटलो.....

मानसी..........याच नावाने ती मला प्रथम भेटली.एक युवती या नात्याने की आणखी कोणी ? तो पूर्ण दिवस मी तिच्या बरोबर घालवला; पण मी तिला कधी मानसी या नात्याने बघितलेच नव्हते.तो दिवसभर तिच्यासोबत केलेला प्रवास तिचे बोलने सर्व कही मला नविन होते. तिच्यातील नाविन्य, चैतन्य, भविष्याची ओढ़, पण या सर्वातून तिचे स्वतंत्र जीवनच अनुभवायला मिळाले.तिला मला भेटण्याची ओढ़ आणि त्याच प्रेरणेला नियतीने दिलेला उधान प्रतिसाद!!! तिच्या डी.एड. च्या एडमिशनच्या प्रत्येक वेळी नियतीने किती-किती बहाण्याने आम्हाला सोबत ठेवले. बसमध्ये तिच्यासोबतचे ते प्रथम भेटीचे क्षणच मला मानसीच्या जवळ घेउन गेले. तीचे निखळ हास्य आजही वेड लावतेय मला.
आजही आठवतात ते शब्द तीचे, जेंव्हा मी तिला "तू डी. एड. करू नकोस,BCA कर" म्हणून सांगितले होते.तेंव्हा तिने घरी सांगितलेही होते की, "आता बघ मी डी. एड. करते का ते." अनमोलची मानसी अनमोल सोबत कोणत्याही मार्गावर चालायला तयार होती.

No comments:

"राजाचे जग.....एक मार्ग यशाचा"

आपण आहात "राजाचे जग.....एक मार्ग यशाचा" या एका वेगळ्याच विश्वात.......हो अगदी माझ्यासोबत. हे किती काल्पनिक आहे ना की आपण एक व्यक्तीवर प्रेम करतो आणि त्या व्यक्तीला माहित पण नसते की कोणाचे आपल्यावर इतके उद्दात प्रेम असुही शकेल? पण प्रेम तेच..........जे तुमच्यासोबत सर्व जग त्याची अनुभूति घेते.प्रेम तेच ............जे सर्वदूर आणि सवंगासुन्दर असते.प्रेम तेच..........जे मानसीने अनमोलवर केले आणि तीही चिम्ब झाली मानसी.........अनमोलच्या प्रेमात!!!